
* प्रयोगशाळेला एनएबीएलचे मानांकन
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।
राज्यात आरोग्य सेवेत अग्रगण्य असलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने आरोग्यसेवेचा दर्जा कायम टिकवून ठेवला आहे. बाह्य, अंतरुग्ण उपचारा, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातुन रुग्णालयाने नावलौकीक मिळवला आहे. राष्ट्रीय परीक्षण आणि असंशोधन प्रयोगशाळा प्रमाणन मंडळाने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोगशाळेला चारवर्षाकरीता मानांकनाचा दर्जा दिला आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय परीक्षण आणि संशोधन प्रयोगळा प्रमाणन
DEPARTMENT OF MICROBIOL सूक्ष्मजीवशास्त्र विभाग
मंडळाने मानांकन पत्र दिले आहे. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी आणि व्हायरल लोड या प्रयोगशाळा २०१० पासून कार्यरत असून २०२० पासून त्यांना सातत्याने एनएबीएल मानांकन
मिळत आहे. या प्रयोगशाळेत प्रामुख्याने एचआयव्ही संशयित रुग्णांची तपासणी, समुपदेशन आणि बाधित रुग्णांमधील विषाणूंची संख्या तपासण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. तपासण्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या प्रयोगशाळेची कामगिरी राज्यातील इतर प्रयोगशाळांच्या तुलनेत उल्लेखनीय ठरली आहे.
प्रयोगशाळेतील कामाचा दर्जा आणि अचूकता तपासण्यासाठी एनएबीएल' 'च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दोन दिवसीय सखोल परीक्षण केले होते. प्रयोगशाळेची उपकरणे, तंत्रज्ञांची कार्यक्षमता, अहवालांची अचूकता आणि व्यवस्थापन अशा विविध निकषांवर ही तपासणी केली होती. या परीक्षणात प्रयोगशाळा दर्जेदार असल्याचे निदर्शनास आले. प्रयोगशाळेत आयसीटीसी १ व २ मध्ये दरवर्षी २० हजार, व्हायरल लोड प्रतिवर्षी २५ हजार, स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी दरवर्षी ३ हजार तपासण्या या प्रयोगी शाळेत करण्यात येतात.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis