नांदेडला भाजपचे वर्चस्व ,अशोक' नीतीचा काँग्रेसला जोराचा धक्का
नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत तब्बल ८१ पैकी ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेली जवळपास तीन दशके काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महाप
नांदेडला भाजपचे वर्चस्व ,अशोक' नीतीचा काँग्रेसला जोराचा धक्का


नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)।

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत तब्बल ८१ पैकी ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेली जवळपास तीन दशके काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात एकवटलेल्या सर्वच राजकीय स्थानिक नेतृत्वाला भाजपने आस्मान दाखवले आहे.

२० प्रभागांतील ८१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४९१ उमेदवार रिंगणात होते. सुरवातीपासूनच भाजपने आघाडी घेत २९ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला दूर ठेवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले, 'एमआयएम'ने मात्र १४ जागा मिळवत अपेक्षित यश मिळवले. शिवसेना ४, राष्ट्रवादी २ तर वंचितचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या मीनल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खातेही उघडता नाही.

खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुकीपूर्वी सूक्ष्म नियोजन केले होते. सक्षम उमेदवारांची निवड, संघटित प्रचारयंत्रणा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभा याचा भाजपला मोठा फायदा झाला. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी,

नांदेडकरांनी विकासाला, सकारात्मकतेला कौल दिला आहे. विरोधकांकडे मुद्देच नव्हते, फक्त अपप्रचार केला.

शिवसेना हे पक्ष प्रभावी रणनीती उभारण्यात अपयशी ठरले. विरोधकांचा प्रचार प्रामुख्याने टीकेपुरता मर्यादित राहिला; विकासाचा ठोस अजेंडा मतदारांपुढे मांडण्यात ते कमी पडले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात राजकीय वारे बदलल्याचे चित्र याआधीच दिसून आले होते. नगर परिषद निवडणुकांनंतर महापालिकेची सूत्रेही त्यांच्या हातात आली. विकासकामांची आश्वासने, केंद्र-राज्य सरकारची साथ यावर मतदारांनी विश्वास दाखविल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande