दोन घटनांमध्ये निकालासाठी आलेल्यांचा ११ लाखांचा ऐवज चोरीला
छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गरवारे स्टेडियमसह इंजिनीअरिंग कॉलेज रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध
दोन घटनांमध्ये निकालासाठी आलेल्यांचा ११ लाखांचा ऐवज चोरीला


छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गरवारे स्टेडियमसह इंजिनीअरिंग कॉलेज रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ११ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या चोरी प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित अन्य आरोपी पसार झाले.

या प्रकरणामध्ये पहिल्या घटनांमध्ये प्रशांत जैस्वाल (वय २६, रा. संत रविदास कॉलनी, सातारा परिसर) हे महापालिकेचा निकाल पाहण्यासाठी गरवारे स्टेडियमच्या गेटवर थांबले होते. निकाल ऐकून ते बाहेर पडत

असताना, गर्दीत एका तरुणाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅमची सोन्याची साखळी खेचली.

जैस्वाल यांनी तत्काळ त्या तरुणाला पकडले; मात्र गर्दीचा फायदा घेत त्याने साखळी साथीदाराकडे टाकली. त्याचा साथीदार पळून गेला. एका व्यक्तीला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गर्दीचा फायदा घेत नरेंद्र आव्हाड, सात्विक टेपाळे व शुभम गोंडे या तिघांचेही सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम असा सुमारे नऊ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरल्याचे कबूल केले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार रमेश तांबोरे करीत आहेत.

उस्मानपुरा येथील शासकिय इंजिनिअरिंग कॉलेज रोडवर विशाल विकास पाटील (वय ३५, रा. पेशवे नगर, बीड बायपास) हे मित्रांसोबत डी.एड. कॉलेजसमोर निकाल पाहण्यासाठी थांबले असताना गर्दीचा फायदा घेत, विशाल पाटील याच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपये किंमतीची तीन तोळे वजनाची 'विशाल' नावाचा पेंडंट असलेली सोन्याची चेन चोरून नेली. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार खिल्लारे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande