अमरावती महापालिका निवडणुकीत अपक्षांना सपशेल नाकारले
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महापालिका निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १२० जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु एकाही उमेदवाराला विजय
अमरावती महानगरपालिकेत 4 माजी महापौरांपैकी 3 विजयी:उपमहापौरांमध्ये मात्र एकालाच यश, तिघांचा पराभव


अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)।

अमरावती महापालिका निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १२० जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.

पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवारांना किमान २० ते कमाल दीड हजार मते मिळाली आहेत. महापालिकेच्या २२ प्रभागांमधील ८७ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये चुरस होती आणि अपक्षांनाही काही जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला.

माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ६६१ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. यापैकी ५४१ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते, तर १२० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या १२० अपक्ष उमेदवारांपैकी एकालाही मतदारांनी विजयापर्यंत पोहोचू दिले नाही.

मतदारांनी अपक्षांना नाकारण्यामागे काही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार निवडून आल्यास काही वेळा 'घोडेबाजार' होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मतदारांना नुकसान सोसावे लागते. तसेच, अपक्षांना राजकीय पाठबळ नसल्याने ते प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांकडून पुरेसा निधी मिळवू शकत नाहीत, अशी मतदारांची धारणा आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अपक्षांना नाकारण्याची ही भूमिका गेल्या काही वर्षांपासून अधिक दृढ होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande