नाशिक जिल्हा बँकेच्या ठेवी वाढीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट लागू
नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा बँकेच्या ठेवीत वाढ करण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेने शाखाधिकारी व सेवकांना उद्दिष्ट दिले आहे. वैयक्तिक नवीन दहा ठेवीदारांकडून प्रत्येक सेवकाने दरमहा दहा हजार रकमेची शंभर दिवस कालावधीची मुदतठेव जमा करावी, असे निर्देश
नाशिक जिल्हा बँकेच्या ठेवी वाढीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट लागू


नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा बँकेच्या ठेवीत वाढ करण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेने शाखाधिकारी व सेवकांना उद्दिष्ट दिले आहे. वैयक्तिक नवीन दहा ठेवीदारांकडून प्रत्येक सेवकाने दरमहा दहा हजार रकमेची शंभर दिवस कालावधीची मुदतठेव जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा बँकेचे कर्मचारी व अधिकारी मैदानात उतरले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने आर्थिक बळ दिले आहे. त्यापुढे जात आता आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या जिल्हा बँकेचे आर्थिक सुदृढीकरण व कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँक, नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने या बँकेसाठी नवीन योजना दिली आहे. याअनुषंगाने बँकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पत्रक काढले आहे.

यात बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांत बँक नफ्यात आणण्यासाठी पुढाकार योजना तयार करत नाबार्डला पाठवली आहे. वैयक्तिक नवीन दहा ठेवीदारांकडून प्रत्येक सेवकाने दहा हजारांची ठेव शंभर दिवसांसाठी जमा करावी. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी ही ठेव ठेवावी. त्यापोटी ३.७५ टक्के व्याज दिले जाणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande