
छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपला ५७ जागा मिळाल्या आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी अख्खे पॅनेल विजयी झाले आहे. पुन्हा केवळ भाजप नव्हे तर शिवसेना व एमआयएम पक्षाच्या उमेदवारांचेही अख्खे पॅनेल काही ठिकाणी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.
प्रभाग क्रमांक १६, १७ व २६ मध्ये भाजपचे अख्खे पॅनेल विजयी झाले आहे. यातील प्रभाग क्रमांक १६ 'अ'मध्ये संगीता नितीन सांगळे, 'ब'मध्ये राजू जगन्नाथ वाडेकर, 'क'मध्ये आशा नरेश भालेराव, तर 'ड'मध्ये राजेश्वर बाबुराव भादवे यांनी बाजी मारली. सीमा सिद्धार्थ साळवे १७ 'अ'मध्ये, 'ब'मध्ये अनिल श्रीकिशन मकरिये, 'ड'मध्ये किर्ती महेंद्र शिंदे, तर 'ड' मध्ये समीर सुषाभ राजूरकर विजयी झाले. तसेच २६ 'अ' मध्ये अनिता मोहन साळवे, 'ब'मध्ये पद्मसिंह राजपूत, 'क'मध्ये सविता कुलकर्णी व 'ड'मध्ये आप्पासाहेब हिवाळे यांनी बाजी मारली. त्याचप्रमाणे प्रभाग २८ 'अ'मध्ये सुनीता मनोज वाहूळ, 'ब'मध्ये अब्दुल मतीन खान, 'क'मध्ये नसीन बेगम महंमद
अफसर, तर 'ड'मध्ये शेख साबेर पाशू हे चारही एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे, प्रभाग २९ 'अ' मध्ये सिद्धांत शिरसाट, 'ब'मध्ये अनिता घोडेले व 'क' मध्ये श्वेता त्रिवेदी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरले.
प्रभाग २८ 'अ'मध्ये भाजपच्या सुनिता वाहूळ या आठ हजार ५२ मतांनी, तसेच याच प्रभागाच्या 'ब'मध्ये एमआयएमचे अब्दुल मतीन हे सहा हजार ६६२ मतांनी व 'क'मध्ये एमआयएमचे नसीम बेगम या सहा हजार ७०४ मतांनी, प्रभाग क्रमांक २९ 'ड'मध्ये शिवसेनेच्या श्वेता त्रिवेदी या सहा हजार ४५० मतांनी, तर १५ 'अ' मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन सूर्यकांत खैरे एक हजार ९९२ मतांनी विजयी झाले. तर, याच प्रभागात 'ड'मध्ये शिवसेनेचे ऋषिकेश प्रदीप जैस्वाल हे अवघ्या २८८ मतांनी काठावर विजयी झाले. तसेच 'क'मध्ये एमआयएमच्या नूर जहान इक्बाल यादेखील केवळ १९९ मतांनी विजयी झाल्या. त्याचवेळी १६ 'ब'मध्ये राजू वाडेकर चार हजार १०९ व १७ 'ड'मध्ये राजूरकर हे तीन हजार ९२१ मतांनी विजयी झाले आहे.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १५, १६, १७, २६, २८ व २९ प्रभागांच्या मतदानाची मोजणी झाली. ही मोजणी सुरू झाल्यापासूनच काही उमेदवारांची पहिल्यापासूनच लीड होती; किंबहुना त्यांची लीड तुटलीच नाही, अशीच काहीशी स्थिती होती. यात प्रभाग २९ मध्ये सिद्धांत सिरसाट हे ४,१५६ मतांनी विजयी झाले आणि त्याची जवळजवळ पहिल्यापासून लीड होती. अशीच स्थिती अनिता घोडेले, श्वेता तिवारी या तिन्ही शिवसेनेच्या उमेदवारांची होती. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपचे समीर राजूरकर, अनिल मकरिये, किर्ती शिंदे आदी उमेदवारांची लीड कायम होती, असे सातही फेऱ्यांमध्ये दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis