अनुराज रासकटला यांची ‘माय भारत’ आंतरराज्यीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमासाठी निवड
परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)। भारत सरकारच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था मेरा युवा भारत (माय भारत) दरवर्षी त्यांच्या मुख्य उपक्रमांचा भाग म्हणून आंतरराज्यीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन करते. याच उपक
अनुराज रासकटला यांची ‘माय भारत’ आंतरराज्यीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमासाठी निवड


परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)।

भारत सरकारच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था मेरा युवा भारत (माय भारत) दरवर्षी त्यांच्या मुख्य उपक्रमांचा भाग म्हणून आंतरराज्यीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन करते. याच उपक्रमाअंतर्गत माय भारत, बेंगळुरू येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून कृतीशील तरुण म्हणून अनुराज मोहन रासकटला यांची निवड झाली आहे.

या कार्यक्रमात अनुराज रासकटला हे मराठवाडा विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून विविध राज्यांतील तरुणांशी संवाद, अनुभवांची देवाणघेवाण तसेच सामाजिक, शैक्षणिक व युवा सक्षमीकरण विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागाचा गौरव वाढला आहे.

अनुराज रासकटला हे युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, वाचन चळवळ, स्वयंसेवी उपक्रम तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande