पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निकाल लागला तरी महापौरपदाचे आरक्षण गुलदस्त्यातच
पिंपरी, 18 जानेवारी (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला, तरी महापौरपदाचे आरक्षण अद्याप घोषित न झाल्याने उत्सुकता वाढली आहे. शहरातील लोकसंख्या, तसेच महापौर आरक्षण लागू झाल्यापासूनचा सविस्तर तपशील पिंपरी-चिंचवड महापालिकेन
PCMC


पिंपरी, 18 जानेवारी (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला, तरी महापौरपदाचे आरक्षण अद्याप घोषित न झाल्याने उत्सुकता वाढली आहे. शहरातील लोकसंख्या, तसेच महापौर आरक्षण लागू झाल्यापासूनचा सविस्तर तपशील पिंपरी-चिंचवड महापालिकेने सप्टेंबरमध्ये राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अद्यापही महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार आहे. मात्र, महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, हे अस्पष्ट आहे.आतापर्यंत महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), तसेच अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गांतील नगरसेवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता केवळ अनुसूचित जाती (एससी) हा प्रवर्ग शिल्लक राहिल्याने, यावेळी महापौरपद ‘एससी’साठी आरक्षित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande