
परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)। सोनपेठ ते गंगाखेड या रस्त्यावरील सायखेडा शिवारात दोन मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले.
एम.एच. 22 ए.जे. 5730 या मोटारसायकलवर दोघे खडका येथून शेळगावकडे तर एम.एच. 38 एच. 9746 या मोटारसायकलवरुन अन्य दोघे जात होते. सायखेडा शिवारात गणपती मंदिराजवळ या दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात महेश अशोक यादव (रा.खडका) या 24 वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अतूल रामेश्वर यादव, सोमनाथ जोगदंड व सुभाष पाचंगे हे तीघे जखमी झाले. जखमींवर परभणी आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis