पुणे मनपावर ‘नारीशक्ती’चा दबदबा, ८८ नगरसेविकांचा घुमणार सभागृहात आवाज
पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)महापालिकेच्या नवीन सभागृहात तब्बल ८८ महिला नगरसेविका असणार आहेत. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येने नगरसेविका असणार आहेत. महापालिकेच्या १६५ जागांसाठी ३५० महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील ८८ महिला निव
पुणे मनपावर ‘नारीशक्ती’चा दबदबा, ८८ नगरसेविकांचा घुमणार सभागृहात आवाज


पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)महापालिकेच्या नवीन सभागृहात तब्बल ८८ महिला नगरसेविका असणार आहेत. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येने नगरसेविका असणार आहेत. महापालिकेच्या १६५ जागांसाठी ३५० महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील ८८ महिला निवडून आल्या असून सभागृहात नारीशक्तीचा आवाज घुमणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी महापौरपद महिला नसरसेविकेला देऊ शकतात.पालिकेत ७७ पुरूष नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी एकूण जागांमधील ५० टक्के ( ८३ जागा) महिलांसाठी राखीव होत्या. अनेक राजकीय पक्षांनी यंदा खुल्या वर्गातील जागांवरही महिलांना संधी दिली होती. त्यामुळे, यावर्षी राखीव जागांपेक्षा पाच अधिक महिला सदस्या निवडून आल्या आहेत. त्यात सर्वाधिक ६७ महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत.महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, अपक्ष अशा एकूण तब्बल ४८८ महिलांनी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांमधील महिला उमेदवारांना आपापल्या प्रभागांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या ३५० इतकी होती. २०१७ च्या तुलनेने यंदा महिला उमेदवारांची संख्या कमी होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande