सकारात्मक पत्रकारिता समाजाला दिशा देणारी - पद्मश्री धर्माधिकारी
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)। सकारात्मक पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी असते. बातमी देण्याच्या घाईपेक्षा तिच्यातील सत्यता महत्त्वाची असते. अशी पत्रकारिता करणारे पत्रकार मार्गदर्शकाची भूमिका बजावतात, असे मत नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी व्यक
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद


बीड, 18 जानेवारी (हिं.स.)। सकारात्मक पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी असते. बातमी देण्याच्या घाईपेक्षा तिच्यातील सत्यता महत्त्वाची असते. अशी पत्रकारिता करणारे पत्रकार मार्गदर्शकाची भूमिका बजावतात, असे मत नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परळी येथील महिला महाविद्यालयात दर्पण दिन व मूकनायक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शंकरआप्पा मोगरकर होते. प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत संपादक यमाजी मालकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, रिपाई नेते सचिन कागदे, ज्येष्ठ पत्रकार अनंत भातांगळे, माऊंट लिटरा स्कूलचे उपाध्यक्ष कैलास घुगे उपस्थित होते. रामप्र . रामप्रसाद शर्मा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. रविंद्र जोशी, स्वानंद पाटील, मिलिंद चोपडे यांना दर्पण पुरस्कार मिळाला. दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, सुकेशनी नाईकवाडे यांना मूकनायक पुरस्कार देण्यात आला. कराड हॉस्पिटलतर्फे देण्यात येणारा रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्कार प्रा. प्रवीण फुटके यांना मिळाला.

--------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande