पुणे महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी
पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशाच्या बळावरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढवण्याचाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १३ ताल
पुणे महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी


पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशाच्या बळावरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढवण्याचाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भाजपची कमी-जास्तप्रमाणात ताकद आहे. पण त्याला अजून थोडे बळ दिले तर जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलण्यापासून कोणी रोखणार नसल्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाला बरोबर घ्यायचे की नाही यावर सध्या प्रकर्षणाने चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आल्याने नाराज झालेल्यांना आपल्या गोटात दाखल करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. परंतु, आतापर्यंत अपेक्षित असे बन दिले न गेल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कमळ फुलले गेले नाही. शिंदेसेनेला बरोबर घेऊन आगामी निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्यातच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला घवघवी यश मिळाले. त्यामुळे झेडपी पंचायत समितीची निवडणुकही स्वबळावरच लढवण्याचा एल्गार काही पदाधिकाऱ्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande