
पुणे, 18 जानेवारी (हिं.स.)राज्यात ज्या पद्धतीने महानगरपालीकांच्या निवडणूकांना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीबरोबर आम्ही एकत्र आलो, त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांमध्येही आम्ही अजितदादांबरोबर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये भाजपने प्रचंड पैशांचा वापर केला, नको त्या गोष्टी करून निवडणूका जिंकल्या आहेत, असे मत राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.महापालिका निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर बारामती-शारदानर येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पत्रकारांशी बोलत होते.
दुसरीकडे, महापालिका निवडणकांमधील पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. शेवटी मतदार राजा हाच सर्वोच्च असतो. त्याने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. तसेच, 'इव्हीएम'विषयीदेखील मला काहीही बोलायचे नाही. कारण, पराभव होताच 'इव्हीएम'ला दोष द्यायचा आणि विजय झाल्यास गप्प राहायचे हे मला मान्य नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु