सोलापूर महापौरपदी कोणाची लागणार वर्णी?
सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेचे 102 कारभारी निश्चित झाले असून नुकत्याच पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 87 जागा जिंकत भाजपचे कमळ पुन्हा महापालिकेवर फुलले असून यंदा महापौर भाजपच
smc


सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेचे 102 कारभारी निश्चित झाले असून नुकत्याच पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 87 जागा जिंकत भाजपचे कमळ पुन्हा महापालिकेवर फुलले असून यंदा महापौर भाजपचाच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात महापौरपदी कोणाची वर्णी लागेल, याची निश्चिती महापौर आरक्षण जाहीर झाल्यानंतरच होईल. यामुळे सोलापूरचा 39 वा महापौर कोण, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आतापर्यंतच्या महापालिका इतिहासाकडे पाहिले असता 1981 ते 1985 या प्रशासकीय कालावधीचा अपवाद वगळता आजवर एकूण 38 महापौर झाले आहेत. यामध्ये सात महिला महापौरांनी शहराचे नेतृत्व केले असून उर्वरित काळात पुरुष महापौरांना संधी मिळाली. विशेष म्हणजे महापौरपद खुले असतानाही महिलांना संधी देण्याची परंपरा सोलापूरने जपली आहे. मात्र यंदा खुला पुरुष आरक्षण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून तसे झाल्यास महापौरपदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande