
छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील
जायकवाडी पंपहाउस जवळ फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यावर सुमारे चोवीस तासांच्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे पालिकेने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले आहे.
जायकवाडी येथील नवीन पंपहाउसजवळ एक हजार २१० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याचे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. लक्षात आल्यावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले.
शहरात पाणी दाखल झाले. जलवाहिनीच्या फुटीनंतर सुमारे चोवीस तासांनी शहरात पाणी दाखल झाले. त्यामुळे पाणीपुरवठ्यात चोवीस तासांचा खंड ्पडला. हा खंड भरून काढण्यासाठी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis