सोलापूर : मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
सोलापूर, 18 जानेवारी, (हिं.स.)। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथिगृहावर ही भेट झाली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाज
सोलापूर : मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट


सोलापूर, 18 जानेवारी, (हिं.स.)। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथिगृहावर ही भेट झाली आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विराट विजयाची चर्चा सुरू असताना व सोलापूर जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू असताना या भेटीला अधिक महत्त्व आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला जाण्यापूर्वी चालता- चालता पालकमंत्री गोरे व मोहिते-पाटील पिता-पुत्रांची भेट झाली. महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांचे अभिनंदन केल्याचेही समजते. आज झालेल्या भेटीचा अधिक तपशील समजू शकला नाही.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सध्या सुरवात झाली आहे. जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात जवळपास प्रत्येक तालुक्यात मोहिते-पाटील यांना मानणारा कार्यकर्ता आहे. या भेटीतून जिल्ह्याच्या राजकारणात नवीन काही समीकरणे घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande