
सोलापूर, 18 जानेवारी, (हिं.स.) सध्याच्या काळातील निवडणुका या आर्थिक दृष्टिक खर्चिक झाल्या असताना देखील तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी दोन दिवसात 46 अर्जाची विक्री झाल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेली नऊ वर्षे प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या नुकत्याच झालेल्या मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल झाल्यामुळे उमेदवाराचे दिवाळी निघाले तर मतदारांची दिवाळी झाली. अगदी त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांची देखील शिवरात्रीच्या पूर्वस्येला दिवाळी साजरी करण्याची संधी मिळते की काय अशी शक्यता निर्माण झाली असतानाच सध्या राजकीय गोठात बैठका झडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रभारी रामेश्वर मासाळ यांनी निवडणूक लढवण्याचा इशारा दिला प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या आखाड्यात राहतात की नुसती लढण्याची घोषणाच राहते हे देखील येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड