
सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।
जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी हुलजंती गटात तीन वर्षापासून तयारी केलेले उद्योजक हनुमान दुधाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.यावेळी उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उद्योगपती कामानंद हेगडे, माजी उपसभापती शिवाजी पटाप, काशिनाथ पाटील, नंदू जाधव, नागेश मासाळ,बंडू शेणवे,विकास दुधाळ आदीसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्योजक हनुमंत दुधाळ यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून हुलजंती जिल्हा परिषद गटात तयारी केली. त्यासाठी त्यांनी या गटातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उपक्रमाला मदत केली.याशिवाय धार्मिक उपक्रमात देखील सहभाग नोंद व त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका मरवडेत सामाजिक काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली केली. त्यामुळे तेच त्यांचे राजकीय सल्लागार होते. अशा परिस्थितीत त्यांनी हे सामाजिक काम करताना कोणत्याही पक्षाबाबतची भुमिका स्पष्ट केली नव्हती.त्यामुळे त्यांच्या विरोधात माजी सभापती प्रदीप खांडेकर हे लढतील अशी शक्यता होती त्यामुळे या गटातील लढत ही अतिशय लक्षवेधक होणार होते. अशा परिस्थितीत माझी सभापती प्रदीप खांडेकर यांनी भोसे गटातून निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केल्यामुळे यांच्यासाठी हा गट तुर्त दुधाळ यांच्यासाठी मोकळा त्यामुळे त्यांना या मतदारसंघात काहीनी आघाडीकडून लढावे असा सल्ला दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड