परभणीत 16 हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले
प्रभाग 11 मध्ये सर्वात कमी 470 मतदारांचा हात ‘नोटा’वर परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत तब्बल 15 हजार 973 मतदारांनी उमेदवारांना नाकारतांना नोटाचा हक्क बजावला. नोटाला सर्वाधिक पसंती
परभणीत 16 हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले


प्रभाग 11 मध्ये सर्वात कमी 470 मतदारांचा हात ‘नोटा’वर

परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।

महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत तब्बल 15 हजार 973 मतदारांनी उमेदवारांना नाकारतांना नोटाचा हक्क बजावला. नोटाला सर्वाधिक पसंती प्रभाग क्रमांक 14 मध्ये दिली गेली. या प्रभागात 2 हजार 475 मतदारांना कोणताही उमेदवार मतदान करण्यायोग्य वाटला नाही. नोटाला सर्वात कमी पसंती देण्याचे काम प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांनी केले. या प्रभागात केवळ 470 मतदारांनी नोटाचे बटन दाबले.

महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी शहरात 2 लाख 60 हजार 239 मतदार होते. यावेळच्या निवडणूकीत उमेदवारांची संख्याही भरगच्च होती. पक्षांची संख्या मोठी असल्याने अपक्ष म्हणून अत्यंत कमी उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. या संपूर्ण 65 प्रभागातील उमेदवारांपैकी केवळ प्रभाग क्रमांक 7 ब मधून एक अपक्ष उमेदवार निवडून आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिवसेना, भारतीय जनता पक्ष या प्रमुख पक्षांनी बहुतांशी प्रभागात उमेदवार दिले. त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती, परभणी परिवर्तन पॅनल, यशवंत सेना यांनीही काही प्रभागातून उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांमध्ये सर्वच स्तरातील उमेदवारांचा समावेश होता. वर्षानूवर्ष मनपात प्रतिनिधीत्व करणारे व त्याहीपेक्षा नव्यानेच रिंगणात आलेल्या उमेदवारांचा समावेश असतांना प्रत्येक प्रभागातील अ,ब,क,ड अशा चारही जागांवर मतदारांना काही प्रमाणात हे उमेदवार योग्य न वाटल्याने त्यांनी थेट नोटाचे बटन दाबण्यावर पसंती दिली. मात्र हे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर राहीले आहे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षेस न उतरणार्‍या प्रत्येकच गटातील उमेदवारांना या नाराजीचा सामना करावा लागला आहे. त्याचे परिणामही त्या त्या प्रभागातील थोड्या मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांवर दिसून आले आहेत.

या तीन प्रभागात सर्वाधिक नोटा..

प्रभाग क्रमांक 14 या दर्गा रोडवरील प्रभागात सर्वाधिक 2 हजार 475 तर त्या खालोखाल प्रभाग 15 मध्ये 2 हजार 12 तर प्रभाग 12 मध्ये 1 हजार 248 मतदारांनी नोटाला पसंती दिली. प्रभाग 14 मधील क या गटात सर्वाधिक 949 मतदारांनी नोटाचे बटन दाबले.

सर्वात कमी नोटा या प्रभागात..

प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांनी मात्र नोटावर भर दिलेला नाही. केवळ 470 मतदारांनीच नोटाला पसंती दिली. प्रभाग 2 मध्ये 633 तर प्रभाग 1 मध्ये 646 मतदारांनी नोटाचे बटन दाबले.

प्रभागनिहाय नोटाला झालेले मतदान..

प्रभाग 1 मध्ये 646 मतदारांनी नोटाला पसंती दिली. तर प्रभाग 2 मध्ये 633, प्रभाग 3 मध्ये 1152, प्रभाग 4 मध्ये 980, प्रभाग 5 मध्ये 688, प्रभाग 6 मध्ये 751, प्रभाग 7 मध्ये 885, प्रभाग 8 मध्ये 660, प्रभाग 9 मध्ये 734, प्रभाग 10 मध्ये‌ 678, प्रभाग 11 मध्ये 470, प्रभाग 12 मध्ये 1248, प्रभाग 13 मध्ये 1096, प्रभाग 14 मध्ये 2475, प्रभाग 15 मध्ये 2012 तर प्रभाग 16 मध्ये 865 मतदारांनी नोटाला मतदान केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande