अकोला : विहिरीत पडून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)। मुर्तिजापूर,येथील जुनी बस्ती, पोळा चौक परिसरातील प्रजापती लेआउटसमोर असलेल्या एका शेतातील उघड्या व पडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख उबेर ऊर्फ उमर शेख फकीरा (वय १०) असे मृतक
Photo


अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)। मुर्तिजापूर,येथील जुनी बस्ती, पोळा चौक परिसरातील प्रजापती लेआउटसमोर असलेल्या एका शेतातील उघड्या व पडक्या विहिरीत पडून दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख उबेर ऊर्फ उमर शेख फकीरा (वय १०) असे मृतक बालकाचे नाव आहे.

पोळा चौकाजवळील ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत उघडी होती. यापूर्वीही या विहिरीत जनावरे पडून नुकसान झाले होते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी उमर खेळत असताना पाय घसरून उघड्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच हरीश पिंपळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून पिंजर संत गाडगेबाबा बचाव आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत उतरून बालकाचा मृतदेह बाहेर काढला. उमर हा पाच बहिणींमधील एकमेव भाऊ होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उघडी व असुरक्षित विहीर मृत्यूकडे निमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande