निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.) :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक माजी आमदार श्री. धर्मराज सोनकवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पक्
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठक संपन्न


लातूर, 19 जानेवारी (हिं.स.) :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक माजी आमदार श्री. धर्मराज सोनकवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीत बूथनिहाय तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे, स्थानिक प्रश्न, विकासात्मक मुद्दे तसेच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आखावयाच्या रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत संघटितपणे काम करून जनतेच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, सरचिटणीस बबन आबा भोसले, भरत चामले, युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष हरिदास साळुंखे, देवणी तालुकाध्यक्ष महेश जाधव, मनोज कन्नदे यांच्यासह पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande