अभिनंदन सोहळ्यातुन युवा स्वाभिमान पक्षाची ताकद वाढविण्याचे आ. रवि राणांचे आवाहन
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.) | युवा स्वाभिमान पार्टीने यावेळी एकूण ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १५ उमेदवारांनी विजय मिळवून पक्षाची ताकद सिद्ध केली. थोड्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांनाही आमदार रवी राणा यांनी विशेष महत
आ. रवि राणांचा युवा स्वाभिमानच्या विजयी उमेदवारांना संदेश; अभिनंदन सोहळ्यातुन पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन


अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.) | युवा स्वाभिमान पार्टीने यावेळी एकूण ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १५ उमेदवारांनी विजय मिळवून पक्षाची ताकद सिद्ध केली. थोड्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांनाही आमदार रवी राणा यांनी विशेष महत्त्व दिले. पराभूत उमेदवारांचे मनोगत ऐकून घेण्यासाठी त्यांनी तब्बल पाच तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान निवडणुकीतील त्रुटी, अनुभव, मतदारांचा प्रतिसाद तसेच भविष्यातील रणनीती यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की आज जरी १५ उमेदवार विजयी झाले असले तरी ही केवळ सुरुवात आहे. युवा स्वाभिमान पार्टी भविष्यात निश्चितच बहुमताकडे वाटचाल करेल. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, उमेदवार आणि पदाधिकारी हा पक्षाची ताकद आहे. त्यांनी विजयी उमेदवारांना जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करताना शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीने उल्लेखनीय यश संपादन केले असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या सन्मानार्थ आयोजित अभिनंदन सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. या सोहळ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या अभिनंदन सोहळ्यात युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून पक्षाची संघटनात्मक ताकद आणि आगामी काळातील राजकीय दिशा स्पष्टपणे दिसून आली. नवनिर्वाचित नगरसेवक रजनी डोंगरे, अजय जयस्वाल, गौरी शैलेंद्र मेघवानी, किशोर जाधव, नाना उर्फ ज्ञानेश्वर आमले, सुमती ढोके, सचिन भेंडे, नंदा धनंजय सावदे, प्रा. प्रशांत वानखडे, महेश मूलचंदानी, योगेश विजयकर, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे, अँड. सौ प्रीती हर्षल रेवणे उर्फ बनारसे, दीपक किसनलाल साहू उर्फ सम्राट यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी ह. भ.प. सागर देशमुख महाराज, निळकंठ, रावजी कात्रे, सुनील राणा, जयंतराव वानखडे, प्रमोद येवतीकर, कमल किशोर मालानी यांच्या सह आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande