नंदुरबार - अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन -अंजली शर्मा
नंदुरबार, 19 जानेवारी (हिं.स.) नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादू गावीत यांच्या विरोधात तीन- चतुर्थांश (3/4) मताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 27 जानेवारी 2026 रोजी सक
नंदुरबार - अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन -अंजली शर्मा


नंदुरबार, 19 जानेवारी (हिं.स.) नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादू गावीत यांच्या विरोधात तीन-

चतुर्थांश (3/4) मताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, नवीन इमारत, बंधारे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी कळविले आहे.

नवापूर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच महादू गावीत यांच्या विरोधात दाखल

करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. 13 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत

सदस्यांनी तीन-चतुर्थांश बहुमताने हा प्रस्ताव संमत केला. या अनुषंगाने, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या

आदेशानुसार, अविश्वास प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ‘विशेष ग्रामसभा’ आयोजित करण्यात

आली आहे.

ग्रामसभेतील कामकाज:

 सभेसाठी प्रचलित नियमांनुसार गणपूर्ती (कोरम) आवश्यक असेल.

 अविश्वास ठरावाला अनुसमर्थन देण्यासाठी शिरगणना (डोके मोजणी) पद्धतीने साध्या बहुमताने

मतदान घेतले जाईल.

 यासाठी 01 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी ग्राह्य

धरण्यात येणार आहे.

 या दिवशी केवळ अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होणार असून, इतर कोणत्याही विषयावर

चर्चा होणार नाही.

 ग्रामसभेत साध्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यास सरपंच पद रिक्त होईल, अन्यथा सरपंच पद

कायम राहील .

ग्रामस्थांनी सभेला उपस्थित राहताना राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेला कोणताही एक ओळखीचा

पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी

अंजली शर्मा यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande