नाशिक : महापालिकेनंतर आता आयमा निवडणूक गाजणार
After-the
नाशिक : महापालिकेनंतर आता आयमा निवडणूक गाजणार


नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)।अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स ( आयमा) असोसिएशनची निवडणूकदेखील महापालिकेप्रमाणेच चांगलीच गाजणार आहेत. दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच इच्छुकांनी उद्योजक एकता पॅनलची स्थापना केली आहे. छाननीमध्ये आमचे उमेदवारी अर्ज विविध मार्गाने बाद ठरवायचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दबाव आणून आमच्या पॅनलमधील विकास माथूर यांना माघार घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप नुकत्याच स्थापन झालेल्या उद्योजक एकता पॅनलचे संस्थापक राजेंद्र पानसरे यांनी केला आहे. कुणालाही विश्वासात न घेता ललित बुब यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी संधी देण्याची माहिती प्रसर प्रसार माध्यमा ना देण्यात आली. तरीपण आपला ग्रुप कुठेही तुटायला नको म्हणून मी त्यांच्याबरोबर निवडणूक प्रक्रियेत राहिलो. २४ तासांमध्ये संपूर्ण ताकदीने पॅनल उभे केले. परंतु आमच्या उमेदवारांवर माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहे, असा गंभीर आरोप राजेंद्र पानसरे यांनी केला आहे. ३० जानेवारीला मतदान तर ३१जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पदाधिकाऱ्यांसह २१ जागांसाठी २२४६ सभासद मतदान करणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेत नूतन कार्यकारिणीकडे सत्तेची सूत्रे प्रदान करण्यात आले.

सर्व इच्छुकांच्या संमतीनेच निर्णय यासंदर्भात आयमाचे संचालक व बीओपीपी ज्ञानेश्वर गोपाळे म्हणाले की, सर्व इच्छुकांची बैठक घेतली, त्यात सर्वांनी मला आणि माजी अध्यक्षांना अधिकार दिला. त्यानंतर सर्वानुमते आम्ही ललित बुब यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पॅनल स्थापन ; आता माघार नाहीउद्योजक एकता पॅनलचे संस्थापक राजेंद्र पानसरेंनी सांगितले की, मी कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपदासह पॅनलच्या इतर उमेदवारांची माघार घेणार नसून पूर्ण ताकदीने पॅनलला घेऊन ही निवडणूक लढणार आहे. अध्यक्षपद सलग दुसऱ्यांदा देण्याची कुठलीही परंपरा नसताना यांना कशासाठी हे अध्यक्षपद पुन्हा द्यायचे आहे ? असा प्रश्न त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande