
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। परमपूज्य सद्गुरु संत श्री देवानंदजी बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इटोली येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सप्ताहास सुरुवात झाली असून 25 जानेवारी रोजी सांगता होणार आहे. या कालावधीत दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत ह.भ.प. अशोक महाराज इलग (बोधेगाव) यांच्या अमृतवाणीतून संगीत श्रीराम कथा सादर करण्यात येणार आहे.
सप्ताह काळात दररोज संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले 20 जानेवारी रोजी ह.भ.प. नामदेव महाराज फपाळ (सोनपेठ), 21 जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी ताई बागुल (नाशिक), 22 जानेवारी रोजी ह.भ.प. बंडू महाराज इटोलीकर, 23 जानेवारी रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख (पंढरपूर), 24 जानेवारी रोजी सर्वेश्वरी दीदी (नांदुरा, खामगाव) तर 25 जानेवारी रोजी ह.भ.प. माऊली महाराज करंजीकर (आळंदी) यांची कीर्तनसेवा लाभणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम कथेचे श्रवण व हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमपूज्य संत श्री देवानंदजी महाराज सेवा समितीचे उपाध्यक्ष तथा महिला आश्रम, इटोलीचे व्यवस्थापक केशव प्रतापराव घुगे इटोलीकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis