
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।
शहरातील मोठी उमरी परिसरात ओम राऊत नावाच्या तरुणावर आज दुपारच्या सुमारास अचानक जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हिल लाईन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्याचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील उमरी गुडधी रोडवरील रौनक मंगल कार्यालयासमोर भरदिवसा 25 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ओम राऊत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी मारहाणीनंतर जखमीच्या दुचाकीचीही तोडफोड केल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले असून तीन ते चार तरुणांनी मिळून ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेमका हल्ला कशावरून आणि का झाला याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे