अमरावती : महापालिकेच्या राजकारणातून भाजपाची गोल्डन गँग हद्दपार
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)। नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महापालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते पराभूत झाल्याने महापालिकेच्या राजकारणातील भाजपाची गोल्डन गँग हद्दपार झाली असल्याचा सूर शहरात उमटू लागला आहे. त्यामुळे कही खुशी तर
अपने ही गिराते है नशे मन पे बिजलीया...  भाजपातील गोल्डन गँग हद्दपार


अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)। नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महापालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते पराभूत झाल्याने महापालिकेच्या राजकारणातील भाजपाची गोल्डन गँग हद्दपार झाली असल्याचा सूर शहरात उमटू लागला आहे. त्यामुळे कही खुशी तर कही गम दिसून येत आहे. महापालिकेच्या निवडणूकीत भाजपाच्या गोटातून तिकीट वाटपापासून खऱ्या अर्थाने अर्तगत वाद पेटला होता. पक्ष म्हणजे स्वतःची जहागीर समजून भाजपाच्या काही स्वयंघोषीत पदाधिकाऱ्यांनी मनपा निवडणूकीची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यामध्ये काही पदाधिकारी मोठ्या नेत्यांची कटपुतली बाहुली आहे तर काही पदाधिकारी स्वयंघोषीत लिडर आहे. त्यांनी निवडणूकीत मुलाखाती घेवून आपल्या पध्दतीने उमेदवारांना तिकीटाचे वाटप केले. तिकीट वाटपामध्ये अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याने अनेकांनी या पदाधिकाऱ्यांनाच धारेवर धरत त्यांनी आपल्या मर्जीतल्या व पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या तसेच काल-परवा पक्षात आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप केला. त्यानंतर याच चौकडीने युवा स्वाभिमान पक्षासोबत युती केली. प्रचार सुरु झाला त्यानंतर पुन्हा ही युती तोडली. त्याचा परिणाम म्हणजे स्पष्ट बहुमत असलेला भाजपा केवळ २५ वर येवून थांबला आहे.या २५ नगरसेवकांमध्ये काही नविन चेहरे तर काही जुन्या चेहऱ्यांना जनतेने पसंती दिली. मात्र भाजपामधील दिग्गज असलेले व ज्यांच्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अमरावतीत प्रचारासाठी आले ते माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, माजी उपमहापौर चेतन गावंडे, माजी गटनेते सुनिल काळे, माजी उपमहापौर कुसूम साहू, संध्या टिकले, माजी स्थायी समिती सभापती विवेक कलोती, भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गंगा खारकर आदी पराभूत झाल्या आहेत. काहींचा पराभव तर अगदी नवख्या उमेदवारांसारखा आहे. त्यामुळे यावर विचार करणे पक्षासाठी व उमेदवारांसाठी आवश्यक झाले आहे. दरम्यान, शिस्तीचा पक्ष म्हणून जाणाऱ्या ओळखल्या भाजपामधील फंदफितूरी व दुहीचे राजकारण यामुळे पक्षातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. २०१७ मध्ये ४५ जागा काबीज करणाऱ्या भाजपाच्या पारड्यात केवळ २५ सदस्य संख्या पडल्याने कार्यकर्त्यांमधील घुसपूस व संताप प्रगट होवू लागला आहे. वरिष्ठांना आत्मचिंतन करण्याची गरज या निमीत्ताने झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande