छ. संभाजीनगर : गुरुतेग बहादुर शहीद समागम वर्षानिमित्त शाळांमध्ये जनजागृती उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये म
हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष


छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यासंदर्भात शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४४५९ शाळा आहेत. त्यातील ३९४३ शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेऊन जनजागृती करण्यात आली. २५९७ शाळांमध्ये समुह गीत गायनाचे आयोजन करण्यात आले. २९३० शाळांनी प्रभात फेरी काढून गावात जनजागृती केली. ४१२५ शाळांमध्ये माहितीपट व भक्तीगीताचे व्हिडीओद्वारे प्रदर्शन करण्यात आले. आयोजीत केलेल्या विविध स्पर्धांमधून १३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच गुरुतेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित हिंद दी चादर या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पिंपळगाव गंगदेव ता. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत मध्ये श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्षा निमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका ता. सोयगाव येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी ता. गंगापूर प्रभात फेरी काढून त्यांच्या जीवनावर आधारित गीत विद्यार्थ्यांना ऐकवले. तर टोणगाव येथे गुरूतेग बहाद्दूर प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील विविध शाळांमध्ये हे उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande