
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नस्ल्याने सत्तास्थापनेवरून संघर्षाची चिन्हे आहेत.भाजपने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या असल्या तरी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या महायुतीतील घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. पण, या युवा स्वाभिमान पश्न सोबत असेल, तर आम्ही भाजपला मदत करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी जाहिर केल्याने वेगळाच पेच निर्माण झाला आहे. त्यातच आता काँग्रेसनेही सत्ता स्थापन कराणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले, गेल्या निवडणुकीत भाजपला ४५ जागा मिळाल्या होत्या, यावेळी त्यांना तब्बल २० जागा कमी मिळाल्या आहेत. भाजपचा जनाधार घटलेला आहे. मतदारांनी त्यांना नाकारले आहे, तरी देखील भाजपला सत्तेची हाव असल्याने त्यानी सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वास्तविक जनादेश स्वीकारून भाजपने विरोधी पक्षात बसायला हवे. काँग्रेसनेही महापौरपदाच्या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोट बांधण्यचा प्रयत्न सुरू केला आहे.आधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत आम्ही वर्चा करू. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाची मदत घ्यायची, याविषयी निर्णय घेतला जाईल. कुठल्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षाला आम्ही सोबत घेणार नाही.काँग्रेसला त्याची गरज ही नाही शिवसेना उद्धव ठाकरे गट,वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही बोलणी सुरू केली आहे. बसपसोबतही चर्चा केली जाईल. आम्ही समविचारी पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचा आणि अमरावतीच्या विकासाला चालना देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू.डॉ. सुनील देशमुख म्हणाले, या निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला. भाजपने धनसपत्ती, साधनसंपत्तीचा वापर केला. जिल्ह्यातील आमदार हे प्रत्येक प्रभागात येऊन नियोजन करीत होते, पालकमंत्री स्वतः लक्ष ठेवून होते. पण, अमरावतीकर हे गेल्या आठ वर्षांतील भाजपच्या कारभाराला कंटाळले होते. त्यामुळेच भाजपची ४५ वरून २५ वर घसरण झाली आहे. त्या तुलनेत काँग्रेसकडे आर्थिक पाठबळ नव्हते. तरीही काँग्रेसने चांगली कामगिरी केली. काँग्रेसचे १५ उमेदवार निवडून आले. मुस्लीमबहुल भागात काँग्रेला अपेक्षित मते मिळू शकलीं नाही. या ठिकाणी काँग्रेसपेक्षा एमआयएमला अधिक जागा मिळाल्या. या भागातून थोडी साथ मिळाली असती, तर काँग्रेसच्या सहा ते सात जागा निश्चितपणे वाढल्या असत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी