
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। माजी आ. संगीता ठोंबरे यांची शिवसेना उपनेतेपदी वर्णी लागली आहे. पक्षप्रवेशानंतर तत्काळ त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कालच त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता, त्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने अधिकृत पत्र प्रसिद्ध करून संगीता ठोंबरे यांची पक्षाच्या प्रभारी उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
पक्ष प्रवेशानंतर अवघ्या काही तासांतच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सदर निवडीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis