
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : येथील मारुती कॉमन क्लबतर्फे सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाचे आयोजन गुरुवार, दि. 22 जानेावरी ते गुरुवार दि. 29 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मारुती कॉमन क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.
21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. ‘श्रीं’ची आगमन मिरवणूक निघणार असून पुण्यातील प्रभात बँड पथक या मिरवणुकीचे आकर्षण असेल. गुरुवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर सकाळी 8:30 वा. सहस्रावर्तने होतील. सकाळी 10 वा. श्री सत्यविनायक पूजा, सायंकाळी 5:30 वा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बुजुर्ग सदस्य व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्रौ 8 वा.‘श्रीं’ची आरती, मंत्रपुष्पांजली होईल. त्यानंतर रात्रौ 9:30 वा. रूपाली करमरकर प्रस्तुत ‘विठू रंग’ हा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
23 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वा. बागेश्री भजन मंडळाचे भजन, रात्रौ 9 वा. समर्थ रंगभूमी, रत्नागिरी प्रस्तुत महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या अग्निपंख नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. दि. 24 जानेवारी रोजी रात्रौ 9 वा. भरत नाट्यमंडळ, पुणे प्रस्तुत रणजित देसाई लिखित संगीत ‘हे बंध रेशमाचे’ नाटक सादर होईल.
रविवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वा. श्रीगणेशयाग, सायंकाळी 5 वा. हळदीकुंकू समारंभ, रात्रौ 9 वा. कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे-खंडाळा यांच्या वतीने प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘नाटक संगीत मत्स्यगंधा’चा प्रयोग होईल. सोमवारी 26 जानेवारी रोजी सायं. 5 ते 6 माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6 ते 7:30 उपस्थितांना प्रबोधनपर कार्यक्रम होईल. (प्रमुख पाहुण्या : सौ. अनुराधाताई प्रभुदेसाई, अध्यक्ष, लक्ष्य फाऊंडेशन.कर्नल केदार अशोक परांजपे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.) मंगळवार 27 जानेवारी रोजी रात्रौ 9 वा. अजित कडकडे यांचा अभंग-भक्तिसंगीताचा बहारदार कार्यक्रम सादर होईल. बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. श्री सत्यनारायण पूजा, सायं. 5 ते 7 तीर्थप्रसाद, रात्रौ 9:30 वा. ‘अनुबंध’ (वीण नात्यांची) हा कार्यक्रम मारुती कॉमन क्लब महिला मंडळाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होतील. गुरुवार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. ‘श्रीं’ची उत्तरपूजा व सायंकाळी 7 वा.‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक निघेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी