जळगावात महापौर महायुतीचा होणार
जळगाव , 19 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल द
जळगावात महापौर महायुतीचा होणार


जळगाव , 19 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल दिला आहे. मतदानाच्या दिवशी जो प्रकार घडला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.प्रभाग ५ मधून विजयी झाल्यानंतर नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विष्णू भंगाळे म्हणाले की, जळगावात महायुती म्हणून आम्ही लढलो आणि आम्हाला भरपूर यश मिळाले. जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. आम्ही आमचे नेते गुलाबराव पाटील आणि महायुतीचे सर्व नेते, आमदार यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून जळगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरोधकांनी खोटे बोलावे पण रेटून बोलावे असे करून टीका केली. निवडणूक आता पार पाडली असून झालेला विषय आम्ही सोडून दिला आहे, असे विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande