जळगाव शहरात थंडीचा जोर ओसरला
जळगाव , 19 जानेवारी (हिं.स.) गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. सध्या रात्रीचे किमान तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले असून, आगामी २४ जानेवारीपर्यंत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्या
जळगाव शहरात थंडीचा जोर ओसरला


जळगाव , 19 जानेवारी (हिं.स.) गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. सध्या रात्रीचे किमान तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले असून, आगामी २४ जानेवारीपर्यंत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचे प्रमाण मध्यम राहणार आहे. मात्र, २६ जानेवारीनंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला होता. मात्र, त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, रात्रीचा गारवा काहीसा कमी जाणवत आहे.

सध्या रात्रीचा पारा १० ते १४ अंशांदरम्यान असून, पुढील चार ते पाच दिवस हे तापमान १० ते १३ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. थंडीचा प्रभाव कमी असला तरी, २४ जानेवारीपर्यंत सकाळच्या वेळेत धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होऊ शकतो. २४ तारखेपर्यंत थंडी फारशी जाणवणार नसली, तरी उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय झाल्यास २६ जानेवारीपासून जिल्ह्यात हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande