मोबाइलपासून मुलांना दूर ठेवा - डॉ. अनघा शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। ''सोशल मीडियामुळे मुलांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी पालकांनी जागरूक राहावे आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन डॉ. अनघा शिरसाट यांनी
मोबाइलपासून मुलांना दूर ठेवा - डॉ. अनघा शिरसाट


छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। 'सोशल मीडियामुळे मुलांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी पालकांनी जागरूक राहावे आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन डॉ. अनघा शिरसाट यांनी केले. ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी संवादात त्या बोलत होत्या.

विद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील मराठवाडा मानसशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. शिरसाट यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका डॉ. संध्या मोरे उपस्थित होत्या ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी संवादात डॉ. अनघा शिरसाट यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांवरील वाढते दुष्परिणाम' विषयावर बोलताना पुढे डॉ. शिरसाट म्हणाल्या, सोशल मीडियामुळे अभ्यासावर, मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. पालकांनी याबाबत जागरूक राहून, पाल्यांना वेळ देणे आणि त्यांना त्यांना तंत्रज्ञानाच्या अतिवापरापासून दूर ठेवणे काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. पालक प्रतिनिधी प्राप्ती संदीप चव्हाण यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande