
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेळगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांची बंधू ॲड. श्रीकांत विटेकर, नरवाडी जिल्हा परिषद गटातून राधाताई सूर्यवंशी व उखळी खुर्द जिल्हा परिषद गटातून मायाताई मूजमुळे यांनी तसेच तालुक्यातील सर्व पंचायत समिती गणाच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील माय-बाप जनतेने तुडुंब गर्दी केली होती. जिकडे बघावे तिकडे माणसंच माणसं. त्यामुळे या लढाईत सर्वसामान्य मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी ताकतीने असल्याचे पाहून मन अगदी भरून आले असे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा मार्केट कमेटीचे सभापती दशरथ पाटील सूर्यवंशी, लक्ष्मीकांतराव देशमुख , विठ्ठलराव सूर्यवंशी, चंद्रकांत राठोड, पी.एस. राठोड साहेब, मदनराव भोसले, कल्याणराव हिक्के शहराध्यक्ष बळीराम काटे यांच्यासह सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व नगरसेवक पत्रकार बांधव, युवक सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis