सोलापूर - महारेराकडेच ४ हजार गृहप्रकल्पांची माहिती नाही
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)महाराष्ट्रातील घर खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडेच (महारेरा) राज्यातील सुमारे चार हजार नोंदणीकृत गृहप्रकल्पांची सद्यःस्थिती स्पष्ट नसल्याची धक
सोलापूर - महारेराकडेच ४ हजार गृहप्रकल्पांची माहिती नाही


सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)महाराष्ट्रातील घर खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडेच (महारेरा) राज्यातील सुमारे चार हजार नोंदणीकृत गृहप्रकल्पांची सद्यःस्थिती स्पष्ट नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 2017 पासून नोंदणी झालेल्या या प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे की थांबले आहे, प्रकल्प पूर्ण झाले आहेत की अर्धवट आहेत, तसेच सदनिका विक्रीची स्थिती काय आहे, याबाबत कोणतीही अद्ययावत माहिती ‌‘महारेरा‌’कडे उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.

महारेरा नियमांनुसार प्रत्येक विकसकाने आपल्या गृहप्रकल्पाची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. यामध्ये बांधकामाची प्रगती, ऑक्युपेशन सर्टिफिकेट, कंप्लीशन सर्टिफिकेट , विक्रीचा तपशील तसेच तिमाही प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. मात्र, सुमारे चार हजार प्रकल्पांमध्ये अनेक वर्षांपासून कोणतीही माहिती अद्ययावत करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकल्प कायदेशीरदृष्ट्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहेत, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande