जिंतूर न. प. च्या उपाध्यक्षपदी महेमुनीसा पठाण
-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बाळासाहेब भांबळे व बुशरा मोनिस शेख स्विकृत सदस्य परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। जिंतूर येथील नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांच
-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बाळासाहेब भांबळे व बुशरा मोनिस शेख स्विकृत सदस्य


-डॉ. दुर्गादास कान्हडकर, बाळासाहेब भांबळे व बुशरा मोनिस शेख स्विकृत सदस्य

परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।

जिंतूर येथील नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये महेमुनीसा पठाण यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. २०१६ नंतर म्हणजे आठ वर्षांनंतर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. भाजपच्या १६ नगरसेवकांमध्ये या समाजाचे सात नगरसेवक आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून उपाध्यक्षपद मुस्लिम समाजाला देण्याची मागणी केली जात होती. पक्षनेत्यांनी मागणीला मान देत महेमुनीसा पठाण यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. तर डॉ. दुर्गादास कान्हडकर आणि बुशरा मोनीस शेख यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड केली. विरोधी पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव उर्फ बाळासाहेब भांबळे यांची स्विकृत सदस्य पदासाठी निवड करण्यात आली.

या निवडीनंतर सर्व उपस्थितांनी उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांचे अभिनंदन केले. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवासुश्रुषा करणारे व पर्यावरणप्रेमी डॉ. दुर्गादास कान्हडकर यांची स्विकृत सदस्यपदाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यामुळे यापुढे रुग्णसेवेसोबतच जनसामान्यांची देखील सेवा करावी लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande