
जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.) – पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावाच्या नावावर 4,907 बोगस जन्म नोंदी आढळून आल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली.
या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, बिहार येथील आरोपी अजयकुमार दुबे याला अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी पाच आरोपींची नावे तपासात समोर आली आहेत.किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांना देशात घुसवण्याचा मोठा षडयंत्र सुरू आहे आणि ते देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, बोगस जन्म नोंदी रद्द करण्याचे काम सुरु आहे आणि दररोज सुमारे 100 नोंदी रद्द केल्या जातील.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर