
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. २२ जानेवारीला संपूर्ण राज्यात महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पण, महापौरपदाची आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीत कोणाला जागा जाणार, याकडे निवडून आलेल्या सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे. पुणे महापालिकेच्या २०१२ आणि २०१७ या निवडणुका झाल्या. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु