राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंना रौप्य पदक
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे संपन्न झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परभणी जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदकाची कमाई केली आहे. ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस
Parbhani players win a historic silver medal at the National School Gymnastics Competition.


परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)। कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे संपन्न झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परभणी जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदकाची कमाई केली आहे.

ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स या प्रकारात परभणी जिल्ह्यातील दिग्विजय ज्ञानेश्वर पाते, प्रज्वल बालासाहेब अंबोरे, अनिल दिगंबर शिंदगे व श्री साई प्रशांत बोराडे या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, समन्वय व मेहनतीच्या जोरावर दमदार खेळाचे प्रदर्शन करत सांघिक रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रदीप लटपटे तसेच परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव लटपटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे उल्लेखनीय यश संपादन झाले. महाराष्ट्र संघात सहभागी असलेल्या परभणीच्या खेळाडूंनी सांघिक खेळात मोलाचा वाटा उचलत जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढवला आहे. या ऐतिहासिक यशामुळे परभणी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही कामगिरी भविष्यातील युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर व पंडित यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande