बडनेरा विधानसभेसाठी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक द्या; काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रदेश व शहराध्यक्षांकडे मागणी
अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)बडनेरा विधानसभेच्या सर्वांगीण व लोकाभिमुख विकासासाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये किमान एक स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी बडनेरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात
अमरावती महानगरपालिकेत 4 माजी महापौरांपैकी 3 विजयी:उपमहापौरांमध्ये मात्र एकालाच यश, तिघांचा पराभव


अमरावती, 19 जानेवारी (हिं.स.)बडनेरा विधानसभेच्या सर्वांगीण व लोकाभिमुख विकासासाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये किमान एक स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी बडनेरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बडनेरा विधानसभा क्षेत्र सध्या महापालिकेतील प्रभावी प्रतिनिधित्वापासून वंचित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळत नाही. या समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी आणि प्रशासनापर्यंत नागरिकांच्या मागण्या पोहोचवण्यासाठी सक्षम प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. तसेच, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही पक्षाची नैतिक जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे बडनेरा विधानसभेच्या अस्तित्व, विकास व संघटन बळकटीसाठी किमान अडीच वर्षांच्या कालावधीसाठी एक स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावे, अशी नम्र पण ठाम मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या लोकशाही, समता व कार्यकर्ताकेंद्रित विचारधारेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा काँग्रेस कार्यकर्ता समीर जवंजाळ यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande