
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार ओवैसींच्या एमआयएमचा (AIMIM) मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत. सोलापूर, धुळे आणि नांदेडमध्ये एमआयएमचे प्रत्येकी 8, 10 आणि 15 असे एकूण 33 उमेदवार विजयी झाले आहेत. तर मुंबई महापालिकेमध्येही एमआयएमने मुसंडी मारत तब्बल 8 जागांवर विजय मिळवला आहे. मुस्लिमबहुल परिसरात समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी झाल्याचं दिसून आलं. परिणामी आता सोलापूर महापालिका निवडणुकीतही मिळालेल्या घवघवीत यशानंतर एमआयएम पक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात देखील उतरणार आहे. सोबतच पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा निर्धारही त्यांनी केलाय.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड