
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।परभणीजिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव दि. 19 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत होत आहे. आज दि. 19 जानेवारी 2026 रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, येथील क्रीडांगणावर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बालकल्याण रेखा काळम, सहाय्यक संचालक इतर मागास आयोग रामेश्वर मुंडे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय संस्थांमधील बालगृहातील बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी बालकांचे हक्क, बालकांसंबंधी कायदे व भारतीय राज्यघटनेत नमूद केलेले अधिकार यांची माहिती देत, या अधिकारांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.महोत्सवाच्या पुढील दोन दिवसांमध्ये महिला व बालविकास भवन येथे इनडोअर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या तीन दिवसीय महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ देखील महिला व बालविकास भवन येथेच होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis