
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत पाथरी तालुक्यातील मौजे वाघाळा येथे लिंबा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.
यावेळी लिंबा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रुक्मीनबाई पंडितराव भोसले- विटेकर, लिंबा पंचायत समिती गणाच्या उमेदवार विद्याताई भगवानराव दुगाने व वाघाळा पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन लिंबाजी अंबूरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार विटेकर यांनी केले. या मेळाव्यात निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदारांशी संवाद तसेच विकासाभिमुख दृष्टीकोनातून होणाऱ्या प्रचारावर मार्गदर्शन केले.
स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पक्षाने केलेली कामे आणि आगामी काळात होणाऱ्या योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांना जनतेशी जोडून घेण्याचे आवाहन यावेळी केले. या संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम विजय मिळवेल, असा विश्वास आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, माजी सभापती माधवराव जोगदंड, श्रीकांत भैय्या विटेकर, श्री रमेश तांगडे मामा, दत्तराव जाधव, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लिंबा जिल्हा परिषद गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis