
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।जिंतूर तालुक्यात हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त प्रचार रथाचे भ्रमण झाले हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त प्रचार रथाचे आयोजन करण्यात आले. हा प्रचार रथ जिंतूर तालुक्यात जांब तांडा, सायखेडा तांडा, मालेगाव तांडा, राजेगाव तांडा व रायखेडा तांडा या गावांमध्ये फिरला.
या उपक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादुर साहिबजींच्या बलिदानाचे महत्त्व, धर्मस्वातंत्र्याचा संदेश आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. प्रचार रथाचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.या प्रचार रथामुळे तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होऊन समाजात एकता, बंधुता व सहिष्णुतेचा संदेश पोहोचत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis