मनमाडमध्ये ट्रॅव्हल बसची पिकअपला जोरदार धडक; चौघांचा जागीच मृत्यू
मनमाड, 19 जानेवारी (हिं.स.)। : मालेगाव-मनमाड महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी असून २० पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वहऱ्ह
मनमाडमध्ये ट्रॅव्हल बसची पिकअपला जोरदार धडक; चौघांचा जागीच मृत्यू


मनमाड, 19 जानेवारी (हिं.स.)।

: मालेगाव-मनमाड महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी असून २० पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वहऱ्हाणे गावाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती न की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना

बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आले. स्थानिकांनी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तत्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक

असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव-मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर ट्रव्हलमधील प्रवाशांमध्ये किंचाळ्या अन् आरडओरड ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघात इतका भयंकर होता की, पहाटे गावात दूरपर्यंत आवाज आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande