
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.)।
परभणी येथील वैष्णवी शिवशंकर मोरे हिची मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील नामांकित संस्थेत फूड इंजीनियरिंग अँड टेक्नोलॉजी या विषयात पीएच. डी. साठी निवड झाली आहे.
यापूर्वी वैष्णवीने पुणे येथील एमआयटी विद्यापीठातून बी. टेक. (फूड टेक्नोलॉजी) तर छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजमधून एम. टेक. (फूड प्रोसेसिंग टेक्नोलॉजी) पदवी प्राप्त केली होती.तिने सेट, नेट, गेट व आयसीएआर या परीक्षा विशेष प्राविण्याने उत्तीर्ण केल्यामुळे तिची आयसीटी मध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी एच. एम मोरे, प्राचार्य गोपाळ मोरे, शिवशंकर मोरे, मारुती मोरे, सुरेश चिंतलवाड, मारुती देवरे, सुरेश मोरे, रामचंद्र मोरे, बाळू मोरे, राजू देवरे, संतोष देवरे, मनोज मोरे यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis