
छत्रपती संभाजीनगर, 19 जानेवारी (हिं.स.)। जय भवानी क्रीडा प्रतिष्ठाण, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना भाजप आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या ग्रामीण क्रीडा संस्कृती जपणारा, पारंपरिक कुस्तीला प्रोत्साहन देणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय आहे. कै.सुनिल (आप्पा) हरणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ही स्पर्धा गेल्या १० वर्षांपासून संपन्न होत आहे.
याप्रसंगी श्रीराम बाबा शेळके, माजी सभापती राधाकिसन बापू पठाडे, दामू अण्णा नवपुते, भाऊराव मामा मुळे, मंडळ अध्यक्ष सुदाम ठोंबरे, आत्माराम आण्णा पळसकर, माऊली पळसकर, गणेश पळसकर, आप्पासाहेब हरणे पंचक्रोशीतील जेष्ठ मान्यवर कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis