रत्नागिरी : नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईबाबात पोलिसांना निवेदन
रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : अतिवेगाने नियम मोडून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना शहर महिला आघाडीने शहर पोलिसांना निवेदन सादर केले. शहरात अज्ञात वाहनाने १८ जानेवारी रोजी धडक देऊन महिला पडलेल्या अवस्थेत असताना त्या
महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन


रत्नागिरी, 19 जानेवारी, (हिं. स.) : अतिवेगाने नियम मोडून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना शहर महिला आघाडीने शहर पोलिसांना निवेदन सादर केले.

शहरात अज्ञात वाहनाने १८ जानेवारी रोजी धडक देऊन महिला पडलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या अंगावरून गाडी चालवल्यामुळे निष्पाप सुनीता साळवी यांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असणाऱ्या व अतिवेगाने नियम मोडून चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख स्मितल सुरेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक श्री. पाटील, तसेच शहर वाहतूक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका वैभवी खेडेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, सायली पाटील, निवेदिता कळंबटे, राजश्री पिळणकर, प्रीती सुर्वे, मेधा कुलकर्णी, रुक्साना जकी, दिशा साळवी, तसेच महिला पदाधिकारी प्रिया साळवी, रूपाली नागवेकर, योगिता खांडेकर, अवंती गोडपकर, समीक्षा वालम प्राजक्ता खेडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande