‘मिसिंग लिंक’ एक मेपासून सेवेत; सर्वांत रुंद बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशांचा वेळ वाचवणारा आणि घाटातील वळणदार रस्त्याला पर्याय ठरणारा बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वाकडे सरकला आहे. येत्या एक मे पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून
express


पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)।

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशांचा वेळ वाचवणारा आणि घाटातील वळणदार रस्त्याला पर्याय ठरणारा बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वाकडे सरकला आहे. येत्या एक मे पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून, सकाळ माध्यम समूहाने नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे अंतर कापण्यासाठी आता प्रवाशांचे २० ते २५ मिनिटे वाचणार आहेत.या मार्गाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे साकारलेला जगातील सर्वांत रुंद बोगदा हे आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी पाच लेन, अशा एकूण १० लेनचा हा मार्ग आहे. सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा हा बोगदा रस्ते वाहतुकीसाठीचा देशातील सर्वांत मोठा बोगदा म्हणून मान मिळविणार आहे.अत्याधुनिक प्रणाली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग उभारण्यात आला आहे, ज्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे भय आता उरणार नाही. लोणावळा घाटातील केबल स्टेड पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए आणि संबंधित यंत्रणांना दिले आहेत. एप्रिल महिन्यात या मार्गाची तांत्रिक चाचणी आणि इतर सुरक्षा तपासण्या पूर्ण करून महाराष्ट्र दिनाचे (१ मे) औचित्य साधून हा मार्ग जनतेसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande